मुंबई : दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या रमन राघव 2.0 या सिनेमाच्या नावावरुन तुम्हाला नक्की वाटत असेल कि हा सिनेमा मिड 60’s मध्ये घडलेल्या रमन राघव या सिरीयल किल्लरवर आधारित आहे, तर तसं नाही.. हो पण हा सिनेमा नक्की त्या सिरीयल किल्लर रमन राघवशी प्रेरित आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉम्बे वेलवेट या सिनेमानंतर दिग्दर्शक अनुराग कश्यपनं हा सिनेमा as a director हाताळलाय. रमन राघव 2.0 हा एक डार्क थ्रिलर सिनेमा आहे. अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि विक्की कौशल यांच्या कॅरॅक्टर्स भवती फिरणारा हा सिनेमा आहे. 


सिनेमाची गोष्ट


ही गोष्ट आहे एका लॉ मेकर आणि लॉ ब्रेकरची..  लॉ ब्रेकर अर्थातच रमन्ना जी व्यक्तिरेखा साकारली आहे अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने. रमन्ना एक साईकोपाथ किल्लर आहे, मर्डर करण्यात त्याला एक वेगळंच समाधान लाभतं. जवळ जवळ नऊ हत्या केल्यानंतर तो पोलिसांकडे जाउन स्वत:ला सरेंडर करतो. पोलिस मात्र त्याला वेडा समजून त्याच्यावर अजिबात विश्वास ठेवत नाही.. दुसरीकडे राघवन जो एक पोलिस ऑफिसर असून, नशेचा शिकारी आहे, आपल्या गर्लफ्रेन्ड सीमीसोबत राहतोय.. एकीकडे रमन्ना मर्डरवर मर्डर करत फिरतोय, तर दुसरीकडे राघवन त्याचा पाठलाग करत राहतो.. अशा काहीशा पार्श्वभूमीवरचा हा सिनेमा आहे.. 


पूर्वार्ध आणि उत्तरार्ध


रमन राघव 2.0 या सिनेमाचा पूवार्ध क्लास झालाय. अभिनेता नवाजुद्दीन सिद्धीकीचा अभिनय कमाल झालाय. आपल्या नॅचरल अॅक्टिंगच्या जिवावर त्यानं पुन्हा एकदा बाजी मारलीये.. अभिनेता विक्की कौशलनं ही आपली भूमिका चोख पार पाडली आहे. सिनेमाचा उत्तरार्ध थोडा स्लो आहे.. ती स्पीड अचानक कुठेतर हरवतो.. मात्र दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्या जबरदस्त मांडणीमुळे सिनेमा जिवंत राहतो. रमन राघवचे लोकेशन्स, सिनेमातले संवाद, कलाकारांचे परफॉर्मन्स या गोष्टींमुळे सिनेमा आणखी रिअलीस्टिक वाटतो.


सिनेमातील तगडे पॉईंट


त्यात सोने पे सुहागा म्हणजे नवाजुद्धीन सिद्दीकीचा अभिनय. त्याची डायलॉग डिलीवरी, त्याची बॉडी लॅन्गवेज, त्याचा वावर कमाल वाटतो.. 


सिनेमाला किती स्टार्स


सिनेमाला 3.5 स्टार्स.