राणादा-अंजली बाईंच्या लग्नातील वरातीच्या धमाल गाण्याची झलक
झी मराठी वाहिनीवरील प्रसिद्ध मालिका तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील राणादादा-अंजलीबाई यांच्या लग्नाची चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे.
मुंबई : झी मराठी वाहिनीवरील प्रसिद्ध मालिका तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील राणादादा-अंजलीबाई यांच्या लग्नाची चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे.
गायकवाडांच्या घरात तर लग्नाची जोरदार तयारी सुरु झालीये. त्यांच्या लग्नाच्या वरातीतील एक गाण्याचा व्हिडीओ झी मराठीने पोस्ट केलाय.
यातील मंडळीचा जबराट डान्स पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. मालिकेतील राणादाचा दोस्त, तालमीचे उस्ताद यांच्यासह सर्वांचाच सैराट डान्स पाहून तुमचेही पाय त्या गाण्यावर थिरकू लागतील.
पाहा हा जबराट डान्सचा व्हिडीओ