मुंबई : आपल्या शुद्ध हिंदी आणि स्टाईलनं बीग बी अमिताभ बच्चन यांनी आत्तापर्यंत अनेकदा होस्ट केलेला 'कौन बनेगा करोडपती' हा कार्यक्रम पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीसाठी लवकरच येतोय... पण यंदा मात्र या कार्यक्रमात बीग बी नाही तर दुसरंच कुणीतरी प्रेक्षकांना आपलंसं करायला येणार, अशी चर्चा रंगतेय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सामान्य माणसांनाही आपल्या असामान्य बुद्धीमत्तेच्या जोरावर करोडपती बनवण्याचं स्वप्न या कार्यक्रमानं दाखवलं... गेली अनेक वर्ष अमिताभ बच्चन यांनी या कार्यक्रमाचं होस्टिंग आपल्या अनोख्या पद्धतीनं केलं... एका सीझनसाठी शाहरुख खानंही या कार्यक्रमाचं होस्टिंग केलं... पण, त्यानंतर पुन्हा एकदा अमिताभ बच्चन यांना पर्याय नाही, हे लक्षात आलं. 


आता मात्र पुन्हा एकदा दुसऱ्याच एका अभिनेत्याचं नाव 'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमाचा होस्ट म्हणून घेतलं जातंय... हा अभिनेता म्हणजे रणवीर कपूर... 'बॉलिवूड हंगामा' या वेबसाईटनं दिलेल्या माहितीनुसार, बीग बी यांच्याऐवजी रणबीर कपूर यंदाच्या भागात केबीसीचं होस्टिंग करताना दिसू शकतो. 


दरम्यान, याबाबत अजून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.