मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफसोबत ब्रेकअप घेऊन 6 महिने झाल्यानंतर रणबीर कपूरने याप्रकरणी मौन सोडलेय. कतरिनासोबत ब्रेकअप का झाला याचा खुलासा रणबीरने केलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'जेव्हा कधी कोणतेही नाते तुटते तेव्हा ते त्रासदायक असते. माझ्या जीवनात कतरिनाचे महत्त्व वेगळे होते. माझ्या आईवडिलांनंतर माझ्या जीवनावर कोणाचा प्रभाव असेल तर तो कतरिनाचा. मात्र आमचे नाते तुटले ज्याचे मला खूप दु:ख आहे,' असे रणबीर म्हणाला. 


रणबीर आणि कतरिना 'अजब प्रेम की गजब कहानी'च्या सेटवर भेटले होते. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ते जवळ आले. गेल्या काही वर्षांपासून ते लिव्ह इनमध्ये राहत होते. मात्र अचानक त्यांचे नाते तुटले.