नवी दिल्ली : बातमी वाचून धक्का बसला ना? पण रणबीरला काही खरी पोलिस कोठडी झाली नाहीये. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संजय दत्तच्या चरित्रपटासाठी तो सात दिवस येरवडा जेलमध्ये राहणार आहे. संजय दत्तची भूमिका जीवंत वाटण्यासाठी तो एव्हढा खटाटोप करतोय.


त्यामुळे येरवडा जेलमध्ये संजयने घालवलेला काळ शुट करण्याआधी भोपाळच्या जेलमध्ये तो काही दिवस घालवणार आहे. त्याने या भूमिकेसाठी १३ किलो वजन वाढवले आहे. संजय दत्तच्या चित्रपटांच्या जवळपास २०० तासांच्या रेकॉर्डिंग त्याने पाहिल्यात.


संजय दत्तच्या चरित्रपटात तो प्रमुख भूमिका करतोय. त्याला ही भूमिका कितपत झेपेल, ही खुद्द संजूबाबालाच शंका आहे. सर्वांच्या अविश्वासाला खोटं पाडण्यासाठी रणबीर खूप मेहनत घेतोय.


चित्रपटात मुंबई बॉम्बस्फोट प्रकरण, अवैध हत्यार आणि शस्त्र बाळगणं या घटनांचाही समावेश असणार आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन राजकुमार हिरानी करताहेत.