सई ताम्हणकरला करायचं होतं आमिर खानशी लग्न पण...

लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर ही नेहमीच चर्चेत असते. सई ताम्हणकरच्या चाहत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. सई ताम्हणकरणं आजवर अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केलं. त्यानंतर तिनं मिमी या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये देखील पदार्पण केलं. पण खूप कमी लोकांना माहित आहे की सईचा तो बॉलिवूडमधील पहिला चित्रपट नव्हता. 

| Jun 24, 2024, 18:53 PM IST
1/7

सईचा उद्या 25 जुन 1986 रोजी वाढदिवस आहे. त्यानिमित्तानं तिच्याविषयी काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत. तिनं मराठी चित्रपटांशिवाय बॉलिवूडमध्ये देखील काम केलं आहे. आज आपण तिच्या पहिल्या चित्रपटाविषयी जाणून घेणार आहोत. ज्या विषयी कोणाला माहित नाही तो म्हणजे गजनी... तुम्ही बरोबर वाचलत.... 

2/7

सई ताम्हणकरनं 'पिंकव्हिला'ला दिलेल्या मुलाखतीत तिला कोणत्या सह-कलाकाराशी लग्न करायची इच्छा आहे? त्यावेळी सईनं सांगितलं की जेव्हा कास्टिंग 

3/7

सई ताम्हणकरला जेव्हा कास्टिंग डायरेक्टरनं सांगितलं की या चित्रपटात आमिर खान काम करत आहे. तेव्हा त्यांनी लगेच त्याला होकार दिला. कारण कॉलेजच्या दिवसात ती आमिरची खूप मोठी चाहती होती आणि आजही आहे.

4/7

सईनं पुढे सांगितलं की ती तिच्या आईला सांगायची की ती आमिर खानसोबत लग्न करणार. 

5/7

आईला सांगायची ही गोष्ट, 'मी आईला सांगायचे की एकदा मी मोठी झाले की मी आमिरशी लग्न करणार. इतकी वेडी होते मी. त्यानंतर जेव्हा ही संधी समोरून आली तेव्हा माझा आनंद हा गगनात मावेना असा झाला.' 

6/7

सईनं सुभाष घईंच्या ब्लॅक अॅन्ड व्हाईट या चित्रपटातून डेब्यू केला होता. 

7/7

सई सगळ्यात शेवटी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या भक्षकमध्ये दिसली होती.