मुंबई : कतरिना कैफसोबत ब्रेक अप झाल्यानंतर रणबीर कपूरचं नाव कंगना राणावतबरोबर जोडलं गेलं. याबाबतीत खुद्द रणबीर कपूरनंच खुलासा केला आहे. माझ्या आणि कंगनामध्ये तसं काहीही नसल्याचं रणबीर म्हणाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तसंच बॉलीवूड अभिनेत्रींबरोबर डेटिंग न करण्याचं रणबीरनं ठरवलं आहे, अशी बातमी बॉलीवूड लाईफ डॉट कॉम या वेबसाईटनं दिली आहे. रणबीर कपूर दिल्लीमधल्या एका मुलीच्या रिलेशनशीपमध्ये असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. 


कतरिना कैफच्याआधी रणबीर दीपिका पादुकोणबरोबर रिलेशनशीपमध्ये होता, पण या दोघांचं ब्रेक अप झालं.