रणबीर कपूरने घेतला महागडा फ्लॅट
रणबीर कपूरने घेतला महागडा फ्लॅट
मुंबई उपनगरातील पाली हिलमध्ये बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरने फ्लॅट खरेदी केला आहे. हे सांगण्याचं कारण म्हणजे हा फ्लॅट ३५ कोटी रूपयांचा आहे. उपनगरातील हा सर्वात महागडा फ्लॅट असल्याचं म्हटलं जात आहे. या फ्लॅटची किंमत 35 कोटी रुपये आहे.
Updated: May 16, 2016, 02:10 PM IST
मुंबई : मुंबई उपनगरातील पाली हिलमध्ये बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरने फ्लॅट खरेदी केला आहे. हे सांगण्याचं कारण म्हणजे हा फ्लॅट ३५ कोटी रूपयांचा आहे. उपनगरातील हा सर्वात महागडा फ्लॅट असल्याचं म्हटलं जात आहे. या फ्लॅटची किंमत 35 कोटी रुपये आहे.
पाली हिल भागात २ हजार ४६० स्क्वेअर फूटचा हा फ्लॅट आहे, कपूर्सच्या कृष्णा राज बंगल्याजवळच बाराव्या मजल्यावर हा फ्लॅट आहे.
यापूर्वी अक्षय कुमारने वरळीत तर, आमीर खानने पाली हिलमध्ये अपार्टमेंट खरेदी केलं होतं. अक्षय कुमारने स्कायलार्क टॉवरच्या 39च्या मजल्यावरील लक्झरी अपार्टमेंटसाठी 28 कोटी मोजले होते. बॉलीवूडमधील सेलिब्रिटी प्रॉपर्टी खरेदी करताना फूल चेक पेमेंट करतात, अशी सुत्रांची माहिती आहे.