मुंबई : बॉलिवूडमधील एक जोडी सध्या चांगलीच चर्चेत आहे. रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोन हे पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत.  'रामलीला' आणि 'बाजीराव-मस्तानी' यांसारख्या चित्रपटातून रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोन यांची केमिस्ट्री सर्वांनाच आवडली. आता रिअल लाईफ कपल असलेली ही जोडी पुन्हा एकदा आगामी सिनेमामधून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.


अब्बास मस्तान यांचा 'रेस ३' हा सिनेमा लवकरच येणार आहे. या चित्रपटात रणवीर-दीपिका यांचा रोमान्स दिसणार आहे. याबाबतची मात्र अजून कोणतीही अधिकृत घोषणा दिग्दर्शकांकडून झालेली नाही. दीपिका सध्या कॅनडामध्ये ट्रिपल एक्स- रिटर्नस ऑफ झॅंडर एज या सिनेमाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे.