मुंबई :  आज रेल्वेचा परेड दिन आहे. मात्र याच दिवशीही रेल्वे प्रवाशांना रेल्वेच्या ढिसाळ कारभाराचा फटका बसलाय. अभिनेत्री निवेदिता जोशी-सराफ यांना आलेला अनुभव काहीसा असाच आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नांदेड देवगिरी एक्सप्रेसने निवेदिता मुंबईकडे निघाल्या होत्या. मात्र तब्बल पाच तास उशिराने ही रेल्वे निघाली. कसाबसा रेल्वे प्रवास सुरू झाला. मात्र त्यानंतर रेल्वेच्या डब्यातील उंदरांचा सुळसुळाट अत्यंत त्रासदायक असल्याचं निवेदिता यांनी म्हटलंय. 


सर्वच प्रवासी उदरांच्या या त्रासाने वैतागले होते. उंदराने निवेदिता यांची पर्सही कुरतडली. त्यामुळे तर त्या आणखीनच संतापल्या. या सर्व मनस्तापामुळे कधीएकदा मुंबई येतेय आणि कधी एकदा खाली उतरतोय असे झाल्याची प्रतिक्रिया अनेक प्रवासी व्यक्त करत होते. 


निवेदिता तर सीएसटीऐवजी वैतागून ठाणे स्टेशनलाच उतरल्या. रेल्वेच्या या ढिसाळ कारभाराबद्दल निवेदिता जोशी यांनी अत्यंत संताप व्यक्त केलाय.