मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री रविना टंडननं चला हवा येऊ द्याच्या मंचावर हजेरी लावली आहे. मातृ या हिंदी चित्रपटातून रविना कमबॅक करत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी रविना हवा येऊ द्याच्या मंचावर आली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कुशल बद्रिके आणि भाऊ कदमबरोबर रविनानं गाण्यांवर ठेकाही धरला. यावेळी तिच्यासोबत या चित्रपटात काम केलेली मराठमोळी अभिनेत्री दिव्या जगदाळेसुद्धा उपस्थित होती. पोस्टमन काका बनून आलेल्या सागर कारंडेच्या पत्राने रविनाच्या डोळ्याच्या कडाही ओल्या झाल्या. संवेदनशिल अशा विषयावर रविनाचा मातृ हा चित्रपट बेतलेला आहे.