मुंबई : अभिनेता कमल हसन यांच्यासोबत 'चाची ४२०' या सिनेमात दिसलेली चिमुरडी आठवतेय का? काय करत असेल बरं ही चिमुरडी सध्या... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अर्थातच हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल... तर तुम्हाला आमिर खानचा 'दंगल' प्रदर्शित होण्याची वाट पाहावी लागेल. कारण या सिनेमात हीच चिमुरडी पुन्हा एकदा एका नव्या अवतारात दिसणार आहे.


दंगलचं पोस्टर 

या चिमुरडीचं नाव फातिमा सना शेख... पण, ती आता चिमुरडी राहिलेली नाहीय बरं का! फातिमा सध्या 'दंगल' या चित्रपटात आमिरची मुलगी बनून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या समोर यायला सज्ज झालीय. 


फातिमा

कुस्तीपटू गीता फोगटची भूमिका फातिमा साकारणार आहे. 'चाची ४२०'नंतर तिने 'वन टू का फोर', 'बिट्टू बॉस' आणि 'आकाशवाणी' चित्रपटांतदेखील काम केलं. 


दरम्यान, 'दंगल' हा चित्रपट कुस्तीपटू महावीर सिंग फोगट यांच्या जीवनावर आधारीत असून, आपल्या दोन मुलींना कुस्तीपटू बनविण्यासाठी त्यांनी घेतलेले परिश्रम मोठ्या पडद्याच्या माध्यमातून प्रकाशझोतात येणार आहेत. महावीर यांची मुलगी गीता फोगट ही २०१० सालच्या कॉमनवेल्थ स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावलेली पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली होती, तर तिच्या बहिणीला म्हणजेच बबिताला रौप्य पदक मिळाले होते. हा सिनेमा २३ डिसेंबर रोजी प्रदर्शित होतोय.