हैदराबाद : सैराट चित्रपटाचा रिमेक तेलुगू भाषेत होणार आहे. नागराज या रिमेकंचं दिग्दर्शन करणार आहे. याविषयी बोलताना आर्ची म्हणाली, मला सैराटच्या तेलुगू रिमेकमध्ये आर्ची साकारायला आवडेल, जर नागराज अण्णांनी संधी दिली तर मी ही भूमिका पार पाडण्यास उत्सुक असल्याचं आर्चीने म्हटलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र, सध्या तेलुगूतील सैराट चित्रपटाच्या कास्टींगबाबत सध्या कुठलाही निर्णय झालेला नसून याबाबत विचार सुरू असल्याचे नागराज यांनी सांगितले.


हैदराबादमध्ये सैराट चित्रपटाच्या प्रिमियर शोचे आयोजन केले होते. त्यासाठी टीम सैराट महाराष्ट्रातून हैदराबाद येथे आली होती. यावेळी सैराट चित्रपटाचा तेलुगू रिमेक मी स्वत: करत असल्याचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी सांगितलं.


 झी प्रोडक्शन आणि रॉकलाईन व्यंकटेश यांच्यासह तेलुगूतील सैराटचा रिमेक बनविण्यात येत आहे. मात्र, यातील कलाकारांबाबत सध्या काहीच ठरले नसल्याचेही नागराज म्हणाले. 


तर, सुरुवातीला आम्हाला हैदराबादेत कुणीही ओळखत नव्हते, मात्र आता येथील मराठी आणि तेलुगू लोकांचे प्रेम पाहून खूप आनंद होत असल्याचं रिंकू राजगुरूने म्हटले आहे.