मुंबई : तुम्ही लहानपणी लगोरी हा खेळ नक्की खेळला असाल. मराठमोळा मात्र हळूहळू लोप पावत चाललेल्या या लगोरी खेळाला ग्लॅमर मिळवून देण्यासाठी अकलूजमध्ये लगोरीची स्पर्धा आयोजित कऱण्यात आलीये. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या स्पर्धेत सैराटमुळे फेमस झालेली आर्ची अर्थात रिंकू राजगुरुही भाग घेण्याच्या चर्चा रंगल्यात. या स्पर्धेत मराठी चित्रपटसृष्टी तसेच मालिका आणि नाटकातील प्रसिद्ध कलाकाराही उपस्थित असतील. 


रिंकूसह सोनाली कुलकर्णी, स्मिता गोंदकर, हेमांगी कवी, केदार शिंदे, संग्राम साळवी, आदिनाथ कोठारे, मनीषा केळकर, श्रुती मराठे, संजय जाधव, प्रसाद ओक, संजय नार्वेकर सहभाग घेतील.