`होय, मी पुरस्कारासाठी पैसे मोजले!`
पुरस्कार पदरात पाडून घेण्यासाठी कधीकाळी आपण 30 हजार रुपये मोजल्याची कबुली ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांनी दिली आहे.
मुंबई : पुरस्कार पदरात पाडून घेण्यासाठी कधीकाळी आपण 30 हजार रुपये मोजल्याची कबुली ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांनी दिली आहे.
दिल्लीमध्ये ‘खुल्लम-खुल्ला, ऋषी कपूर अनसेन्सर्ड’ या आत्मचरित्राच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी ऋषी कपूर यांनी हा खुलासा केला आहे.
बॉलिवूडमध्ये अमिताभ बच्चन यांच्या 'अॅंग्री यंग मॅन'च्या भूमिकेमुळे मला असुरक्षित वाटू लागले होते. त्यामुळेच मी असं पाऊल उचलल्याची कबुली ऋषी कपूर यांनी यावेळी दिली. 1973 साली आलेल्या 'बॉबी' या सिनेमासाठी उत्कृष्ट अभिनेता म्हणून ऋषी कपूर यांना फिल्मफेअर अॅवॉर्ड देण्यात आलं होतं.
'खुल्लम-खुल्ला, ऋषि कपूर अनसेन्सर्ड' या ऋषी कपूर यांच्या आत्मचरित्रात चाहत्यांना त्यांच्या आयुष्यातील काही रंजक गोष्टी वाचायला मिळणार आहेत.
ऋषी कपूर यांनी 1973 मध्ये वडील राज कपूर यांच्या बॉबी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर त्यांनी अनेक हिट सिनेमे दिलेत.