...हा ठरलाय भारतातला पहिला `मेक इन इंडिया` चित्रपट
सुपरस्टार रजनीकांत आणि अक्षय कुमार यांचा `रोबो 2` हा बिग बजेट सिनेमा पूर्णत: `मेक इन इंडिया` चित्रपट ठरला आहे.
मुंबई : सुपरस्टार रजनीकांत आणि अक्षय कुमार यांचा 'रोबो 2' हा बिग बजेट सिनेमा पूर्णत: 'मेक इन इंडिया' चित्रपट ठरला आहे.
तब्बल साडे तीनशे कोटी रुपयांचं बजेट असलेल्या या चित्रपटात प्रत्येक गोष्ट भारतीय बनावटीची आहे. एखादा भव्य चित्रपट बनवताना त्यात तंत्रज्ञान, स्पेशल इफेक्ट किंवा लोकेशन अशा गोष्टींसाठी आत्तापर्यंत परदेशाची निवड केली जात असे. मात्र 'रोबो 2'ची निर्मिती करताना याला फाटा देत पूर्णपणे देशांतर्गत गोष्टींचाच वापर करण्यात आला आहे.
तांत्रिक बाजू साभाळणारे क्रू मेंबर्सही भारतीय आहेत. 'रोबो 2'चा सिक्वेल असलेला 'रोबो 2' ऑक्टोबर 2017 मध्ये प्रदर्शित होणार आहे.
रजनीकांतसोबत अक्षय कुमार हा खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. रिलीजपूर्वीच या चित्रपटानं अनेक रेकॉर्ड ब्रेक केले आहेत.
शंकर यांचं दिग्दर्शन असलेल्या रोबो 2.0 चा टीझरही अद्याप रिलीज झालेला नाही. मात्र त्यापूर्वीच तमिळ, हिंदी आणि तेलुगू भाषेतील सॅटेलाईट हक्क 'झी टेलिव्हिजन'ने 110 कोटींना विकत घेतले आहेत.