मुंबई : रूस्तम पाहिल्यानंतर घटस्फोटाचे प्रमाण कमी होईल असा आत्मविश्वास अभिनेता अक्षय कुमारने व्यक्त केलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1959 सालच्या के.एम.नानावटी विरूद्ध महाराष्ट्र सरकार प्रकरणावर आधारीत ‘रूस्तम’चं कथानक आहे. यात अक्षय कुमार प्रमुख भूमिकेत आहे. एका नौदल अधिकाऱ्याची ही कहाणी आहे. आपली पत्नी आपल्याला फसवत असल्याचे त्याच्या लक्षात येते. त्यानंतर तो पत्नीच्या प्रियकराची हत्या करतो. न्यायालयात खटला उभा राहतो. आरोपीला जनतेची सहानुभूती मिळते. असं सिनेमाचं कथानक आहे.


“हा सिनेमा पाहिल्यानंतर घटस्फोट कमी होतील. अनेकांचे वैवाहीक आयुष्य वाचेल” असं अक्षयचं म्हणणं आहे. हा चित्रपट खूप काही देणारा आहे असं त्याला वाटतं.


बॉलिवूडमध्ये याआधी कोणीही अशाप्रकारे पारसी अधिकाऱ्याची प्रमुख भूमिका साकारलेली नाही. त्यामुळे या सिनेमाला इंडस्ट्रीतून भरपूर पाठिंबा मिळत आहे. सलमान खान, रणवीर सिंग, सोनाक्षी सिन्हा, सोनम कपूर, करण जोहर अशा सर्व बॉलिवूड स्टार्सनी सोशल मीडियावर रूस्तमचं प्रमोशन केलं आहे. त्याबद्दल अक्षयने सर्वांचे आभार मानले.