मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्यासाठी अख्खी टीम इंडिया पुन्हा एकदा एकत्र आली. निमित्त होतं ते सचिनच्या आगामी 'सचिन अ बिलियन ड्रीम्स' या चित्रपटाच्या प्रिमियरचं... यामध्ये बॉलिवूडही आवर्जुन सहभागी झालं होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


मुंबईतल्या वर्सोवामधल्या पीव्हीआर इथे हा खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सचिनसह त्याची पत्नी अंजली तेंडुलकर, मुलगी सारा आणि मुलगा अर्जून यावेळी उपस्थित होते. यावेळी सगळ्यांच्या नजरा सचिनची मुलगी सारावर खिळून होत्या. 



अर्जुन आणि सारा प्रत्येक पाहुण्याचं मनापासून स्वागत करत होते. सारा यावेळी काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये उठून दिसत होती. उल्लेखनीय म्हणजे, सचिनच्या या सिनेमामत अर्जुनही दिसणार आहे. 



तर टीम इंडियाच्या खेळाडुंसह कर्णधार विराट कोहलीची खास मैत्रीण अभिनेत्री अनुष्का शर्माही या खास शोला हजर होती. 



या खास स्क्रीनिंगसाठी एम एस धोनी, युवराज सिंह यांच्यासोबतच अजिंक्य रहाणे, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमरा, रविंद्र जडेजा, आर अश्विन, केदार जाधव, शिखर धवन, उमेश यादव आणि भुवनेश्वर कुमार हे देखील उपस्थित होते. 



टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफी मालिकेसाठी इंग्लंडला रवाना झाली. त्यासाठीच भारतीय संघाकरता सचिननं आपल्या चित्रपटाच्या खास शोचं आयोजन केलं होतं. 



तर सचिनला क्रिकेटचे धडे देणारे त्याचे गुरु रमाकांत आचरेकर यांना सुद्धा या विशेष खेळासाठी सचिननं विशेष आमंत्रित केलं होतं. 



बॉलिवूडमधून शाहरुख खान, आमिर खान आणि बच्चन कुटुंबियांसोबत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी या कार्यक्रमासाठी आवर्जुन उपस्थित राहिले.