मुंबई :  2 MAD च्या मंचावर सई ताम्हणकर हिने आपल्या नृत्याबद्दलच्या काही भावना व्यक्त केल्या आणि तिचा नवीन वर्षाचा संकल्प प्रेक्षकांना सांगितला. “नवीन वर्षात मी confidently डान्स करायला शिकणार आहे” असे ती म्हणाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2 MAD या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. शोमध्ये TOP 10 ची निवड झालेली असून आता या स्पर्धकांमध्ये विजेतपद मिळवण्याची चढाओढ चांगलीच रंगत आहे. या  मंचावर अनेक कलाकारांनी हजेरी लावली आणि स्पर्धकांना अधिक चांगल्याप्रकारे नृत्य करण्यास प्रोत्साहित केले ज्यामध्ये स्वप्नील जोशी, प्रार्थना बेहरे, अहमद खान याबरोबरच बॉलिवूडची क्वीन कंगना रानौत यांचा समावेश आहे. 


गुढीपाडव्यानिमित्त मराठी प्रेक्षकांची लाडकी तसेच जिने अभिनयाने मराठी चित्रपटसृष्टीत स्वत:चे अढळ स्थान बनवले आहे अशी सई ताम्हाणकर 2 MAD च्या मंचावर येऊन गेली. या कार्यक्रमातील स्पर्धकांचे नृत्य, त्यांच्यामध्ये असलेला नृत्याबद्द्लचा MADness, उत्साह, आणि त्यांचे नृत्याबद्द्लचे प्रेम लक्षात घेऊन सई या मंचावर आली. 


तिने स्पर्धकांशी दिलखुलास संवाद साधला आणि सगळ्यांची मने जिंकली.  तुषारने डोकं फिरलंया हा गाण्यांवर तुफान नृत्य सादर करून सईचे मन जिंकले. सईने सोनल विचारेचं विशेष कौतुक केलं आणि ती सईची लाडकी स्पर्धक आहे असे देखील ती म्हणाली त्यामुळे सोनलला आनंद झाला.  तुषारने सईने सोबत डान्स करण्याची इच्छा व्यक्त केली आणि सईने त्याची ही इच्छा लागलीच पूर्ण केली. आपल्या आवडत्या अभिनेत्रीबरोबर नृत्य करायला मिळाले म्हणून तुषारला खूप आनंद झाला.