नवी दिल्ली : अभिनेता सैफ अली खानचा एक जुनी मुलाखत सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतेय. २००५ साली सैफनं 'द टेलीग्राफ'ला ही मुलाखत दिली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या मुलाखतीत सैफनं पूर्व पत्न अमृता सिंहबद्दल अनेक गोष्टींचा खुलासा केलाय. अभिनेता सैफ अली खान आणि अमृता सिंह यांचा १३ वर्षांपूर्वी घटस्फोट झाला होता. २००४ साली या दोघांचे मार्ग वेगवेगळे झाले होते. त्यानंतर सैफनं बेबो करीनाशी विवाह केलाय. 


'द टेलिग्राफ'ला दिलेल्या या मुलाखतीत सैफनं आपल्या आणि अमृताच्या संबंधांबद्दल अनेक खुलासे केले होते. 'खूप वाईट वाटतं जेव्हा तुम्ही बेक्कार असल्याचं तुम्हाला सतत जाणवून दिलं जातं. प्रत्येक वेळेस आई आणि बहिणीवरून शिव्या दिल्या जातात... मी दीर्घकाळ यातून गेलोय' असं सैफनं यात म्हटलं होतं. 


'घटस्फोटानंतर पोटगीदाखल अमृताला मला ५ करोड रुपये द्यायचे होते... त्यापैंकी २.५ करोड रुपये मी अगोदरच दिलेत...शिवाय माझा मुलगा १८ वर्षांचा होईपर्यंत प्रत्येक महिन्याला एक लाख रुपयेही देत राहील. माझं घरही अमृता आणि मुलांसाठी आहे. मी कुणी शाहरुख खान नाही... आणि माझ्याकडे इतका पैसाही नाही. मी अमृताला संपूर्ण पैसे देण्याचा शब्द दिलाय' असं सैफननं या मुलाखतीत म्हटलं होतं.