मुंबई : प्रदीप बनसोडेची सैराटमधील तानाजीची लंगड्याची भूमिका जशी गाजली, तशी सल्ल्या म्हणजेच अरबाज शेखचीही भूमिका लोकांच्या लक्षात राहिली. मात्र पहिल्या दिवशी तानाजीच्या वाटेला सत्कार आला, तर अरबाजचंही शिक्षकांनी कौतुक केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अरबाज शेख सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील जेऊरमधील भारत कनिष्ठ महाविद्यालयात बारावी कला शाखेत शिकत आहे. अरबाजाने मंगळवारपासून कॉलेजात हजेरी लावली. 


अरबाज हा अत्यंत गरीब कुटुंबातील आहे. पहिल्या दिवशी महाविद्यालयात जाऊन त्याने काही विषयांच्या तासांना उपस्थिती लावली. गेल्यावर्षी अरबाज याच भारत महाविद्यालयात अकरावीमध्ये होता. महाविद्यालयात गेल्यानंतर त्याच्या शिक्षकांनी 'सैराट' सिनेमातील अभिनयासाठी त्याचे कौतुक केले.


 सिनेमातील अभिनयाचे कोणतेही ज्ञान नसताना आपणास केवळ नागराज मंजुळे यांच्यामुळेच 'सैराट' सिनेमात अभिनय करण्याची संधी मिळाल्याचेही अरबाज म्हणाला.  बारावी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन नागराज मंजुळे यांच्या मार्गदर्शनाकाली पुण्यात नाट्यकलेचे शिक्षण घेण्याची इच्छा असल्याचं यावेळी अरबाजने सांगितले.