मुंबई : नागराज मुंजळे यांच्या  'सैराट' या सिनेमाने मराठीत जोरदार गल्ला जमाविण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. प्रचंड यशानंतर हिंदी,  तेलगू, तमिळ, कन्नड , मळ्यालम या भाषेत येणार सैराट येणार आहे. आता हा सिनेमा  पंजाबमध्ये झळकणार आहे. पंजाबी भाषेत या सिनेमाची निर्मिती करण्यात येणार आहे. याचे पोस्टर लॉन्च करण्यात आलेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिगदर्शक करण जोहर यांने 'सैराट'च्या हिंदीचे हक्क विकत घेतले आहेत. त्यामुळे 'सैराट'ने आणखी एक विक्रम केला होता. मराठी चित्रपटाच्या इतिहासात प्रथमच १०० कोटींची कमाई करणाऱ्या आर्ची -परशाच्या अभियानाने 'सैराट'ने सर्वांनाच याड लावले. 
 
पुढील वर्षी १४ जुलै २०१७ ला संपूर्ण जगभर झी स्टुडियो प्रस्तुत आणि व्हाईट हिल प्रॉडक्शन प्रस्तुत सैराट पंजाबीत प्रदर्शित होणार आहे. पंजाबी रिमेकचे दिग्दर्शन पंकज भत्रा करणार आहे. परंतु या चित्रपटामधील प्रमुख भूमिका म्हणजेच आर्ची-परशा कोणते कलाकार साकारणार हे मात्र समजलेले नाही.