प्रिन्स बांगड्यावाल्या भाभीच्या सल्याला विसरला
सैराट चित्रपटातील एका डायलॉगला प्रिन्सदादा म्हणजे सूरज पवार सल्याचं नाव घ्यायलाचं विसरला होता, म्हणून या डायलॉगचा अर्थ भलताच निघत होता, तेव्हा सेटवर हशा पिकला, पण नंतर या संवाद नव्याने चित्रित करण्यात आला.
मुंबई : सैराट चित्रपटातील एका डायलॉगला प्रिन्सदादा म्हणजे सूरज पवार सल्याचं नाव घ्यायलाचं विसरला होता, म्हणून या डायलॉगचा अर्थ भलताच निघत होता, तेव्हा सेटवर हशा पिकला, पण नंतर या संवाद नव्याने चित्रित करण्यात आला.
आर्ची, परशा, सल्या आणि लंगड्या पाटलाच्या शेतात लपून बसतात या दृश्यानंतर. पाटलाच्या घरी बैठक सुरू असते. त्या ठिकाणी मंग्याही असतो. अचानक मंग्याच्या फोनवर सल्याचा कॉल येतो, या दृश्याचं चित्रिकरण सुरू होतं, त्यावेळी हा किस्सा घडला.
पाटील विचारतो कुणाचा कॉल आहे. त्यावर तो मित्राचा म्हणून सांगतो. पण, फोनवरील नावाकडे पाहत पाटलाच्या पाठीमागून प्रिन्स म्हणतो, ''बांगड्यावाल्या भाभीच्याच पोराचा फोन ह्यन ह्यो.'' पण, या वाक्याऐवजी प्रिन्स म्हणजेच सूरज पवारने चुकीचे वाक्य म्हटले होते.
तो म्हणाला होता, ''बांगड्यावाल्या भाभीचाच फोन हाय न ह्यो'' त्यावर एकच हशा पिकला आणि पुन्हा या सीनचे चित्रिकरण नव्याने करण्यात आले.