मुंबई : फँड्री या यशस्वी चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा सैराट हा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर नुकताच बर्लिन आंतरराष्ट्रीय महोत्सवात पार पडला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या चित्रपटाला येथील प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. फेसबुक पोस्टद्वारे नागराज यांनी वर्ल्ड प्रीमियरच्या अनुभवाबाबत सांगितले. प्रेक्षकांच्या इतक्या मोठ्या प्रतिसादाने खुद्द नागराज भारावून गेले.