मुंबई : बॉलिवूड दबंग सलमान खानने काल ट्विटरवर त्याचे वडील सलीम खान यांचं स्वागत केलं. सलीम खान हे त्यांच्या परखड मतांसाठी ओळखले जातात. स्पष्टपणे आपली मतं मांडणं हा त्यांचा स्वभाव. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंगळवारी त्यांनी ट्विटर या सोशल नेटवर्किंग साइटवर पदार्पण केलं. या पदार्पणातच त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचं कौतुक केलंय. त्यांनी ट्वीट करत 'भारत माता की जय' असं म्हटलंय. 


मोहन भागवत म्हणतात आपल्या इतका श्रेष्ठ भारत तयार करायचाय की इथे सर्वांनाच भारत माता की जय म्हणावसं वाटेल. सलाम भागवत साहेब! अनेक जणांना आम्ही बदललो नाही हे सांगायला अभिमान वाटतो. याचा अर्थ असा होतो की त्यांची वाढ होत नाही. बदल होणे याचाच अर्थ वृद्धी होणे असा आहे. भारत माता की जय! सप्रेम' अशा शब्दांत सलीम खान यांनी मोहन भागवतांचं कौतुक केलंय. 





काही दिवसांपूर्वीच ओवैसी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे देशात भारत माता की जय वरुन वातावरण तापलं होतं. त्यावर पुढे बोलताना मोहन भागवतांनी म्हटलं होतं की 'नागरिकांनी स्वतःहून 'भारत माता की जय' घोषणा दिली पाहिजे. यासाठी कोणावर दबाव टाकू नये'.


आता यापुढे प्रत्येक विषयावर सलीम खान यांची मतं त्यांच्या चाहत्यांना वाचायला मिळणार, यात शंका नाही.