सलमानच्या लग्नाबाबत काय बोलले पिता सलीम खान
बॉलिवूड स्टार सलमान खानचं लग्न हा नेहमी चर्चेचा विषय बनतो. सलमानच्या चाहत्यांना त्याच्या लग्नाबाबत खूपच उत्सूकता असते. सलमान खानचे वडील सलीम खान यांनी देखील सलमानच्या लग्नार प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई : बॉलिवूड स्टार सलमान खानचं लग्न हा नेहमी चर्चेचा विषय बनतो. सलमानच्या चाहत्यांना त्याच्या लग्नाबाबत खूपच उत्सूकता असते. सलमान खानचे वडील सलीम खान यांनी देखील सलमानच्या लग्नार प्रतिक्रिया दिली आहे.
सलीम खान म्हणतात की, देवाला ही नाही माहीत की माझा मुलगा लग्न कधी करणार आहे. सलीम खान यांना नेहमी हा प्रश्न विचारला जातो पण त्यावर ते सहसा प्रतिक्रिया देणं टाळतात.
सलीम खान यांनी ट्विट केलं आहे की, 'सलमान केव्हा लग्न करणार या व्यतिरिक्त तुम्ही मला कोणताही प्रश्न विचार शकता. कारण देवाला ही हे नाही माहीत.