सलमान-बडजात्या पुन्हा एकत्र पण...
`प्रेम रतन धन पायो`च्या यशानंतर सलमान खान आणि सुरज बडजात्या पुन्हा एकदा एकत्र चित्रपट करणार आहेत.
मुंबई: 'प्रेम रतन धन पायो'च्या यशानंतर सलमान खान आणि सुरज बडजात्या पुन्हा एकदा एकत्र चित्रपट करणार आहेत. सुरज बडजात्यांच्या या चित्रपटामध्ये सलमानच मुख्य भूमिकेमध्ये असणार आहे, अशी माहिती मिळत आहे. सलमान आणि बडजात्या हे दोघं या चित्रपटाचे निर्मातेही असणार आहेत.
सुरज बडजात्यांचे चित्रपट म्हणजे कौटुंबिक असल्याचं आजपर्यंतच समिकरण आहे. पण सलमानबरोबरचा त्यांचा हा चित्रपट वेगळा असणार आहे. सलमान बरोबरचा त्यांचा हा चित्रपट ऍक्शन ड्रामा असणार आहे.
सलमान खान सध्या त्याच्या 'सुलतान' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. सुलतान हा चित्रपट ईदला रिलीज होणार आहे. त्यानंतरच बडजात्यांच्या या चित्रपटाच्या कामाला सुरुवात होईल.