मुंबई : काँग्रेस नेते बाबा सिद्धिकी यांनी काल रात्री इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीत सलमान खान आणि कतरिना कैफ एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. यावेळी सलमान आणि कतरिना यांनी बराच वेळ एकत्र घालवला. ब्रेकअपनंतर बऱ्याच कालावधीनंतर बॉलिवूडमधील हे दोघंही कलाकार एकत्र आले होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सलमान सध्या कतरिनासाठी निर्मात्यांकडे शब्द टाकत असल्याचीही चर्चा आहे, त्यामुळे त्यांच्या या भेटीने अनेकांच्या भुवया उंचावल्या. या इफ्तार पार्टीत गुलामनबी आझाद, सुशिलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, माणिकराव ठाकरेंसह काँग्रेसच्या नेते हजर होते. दरवर्षी बाबा सिद्धिकी इफ्तार पार्टीचं आयोजन करतात.या इफ्तार पार्टीमध्ये राजकीय नेत्यांपासून बॉलिवूडमधील अनेक तारे-तारकांनी हजेरी लावली होती. 


या पार्टीमध्ये दोघंही वेगवेगळे आले होते. मात्र, आतमध्ये त्यांची भेट झाली. त्यानंतर दोघांनी बराच वेळ एकत्रही घालवला.