ऑफिस जॉबमुळे वजन वाढलंय? दररोज फक्त 10 मिनिटं करा योग, 1 महिन्यात कमी होईल वजन

सध्या अनेकजणांना वजन वाढीची समस्या सतावत आहे. बिघडलेली लाइफस्टाइल, खाण्यापिण्याची सवयी, व्यायामाचा अभाव इत्यादींमुळे वजन वाढते. आजकाल ऑफिसमध्ये एकाच ठिकाणी खूप वेळ बसल्याने सुद्धा शारीरिक समस्या उद्भवतात. काहींचं वजन, पोट वाढतं तर काहींची कंबर, मान सुद्धा दुखू लागते. 

| Oct 13, 2024, 15:47 PM IST
1/6

शारीरिक समस्या आत्ताच सुरू झाली असेल तर भविष्यात हे तुम्हाला अधिक नुकसानदायक ठरू शकते. तेव्हा तुम्हाला अशा काही योगासनांबद्दल सांगणार होत जी तुम्ही दिवसातून 10 मिनिटं जरी केलीत तरी तुमचं वजन कमी होण्यास मदत होऊ शकेल आणि तुम्हाला इतर शारीरिक वेदनांपासूनही आराम मिळू शकेल.   

2/6

वज्रासन : वज्रासन हे योगासन वजन कमी करण्यासोबतच शरीराला अनेक फायदे सुद्धा मिळवून देते. तुम्ही दररोज वज्रासन केल्यामुळे  पोटावर जमा झालेले फॅट्स हळू हळू कमी होऊ लागतात. सोबतच हे योगासन केल्याने गॅस आणि पचनाशी निगडित समस्या निर्माण होऊ शकतात. 

3/6

ताडासन :

 ताडासन हा योग्य पाठीच्या कण्यासाठी फायदेशीर ठरते. ताडासन वजन कमी करण्यासाठी सुद्धा मदत करते. पोटावरची चरबी ताडासन केल्याने कमी होते. तसेच हे योगासन केल्याने तुम्ही रिलॅक्स होऊ शकतात. 

4/6

पद्मासन :

पद्मासन तुमचं बॉडी पोस्चर सुधारण्यासाठी फायदेशीर ठरते. पद्मासन केल्याने तुमची स्मरणशक्ती सुधारते आणि पोट देखील निरोगी राहते. पद्मासन दिवसातून केवळ ते 10 मिनिटं केल्याने डोकं शांत होतं.

5/6

दंडासन :

हाडे आणि स्नायू मजबूत करण्यासाठी दंडासन हे फायदेशीर ठरते. यामुळे पचनक्रिया मजबूत होते. दंडासन केल्यावर तुमचे शरीर ताणले जाते ज्यामुळे हाडे आणि स्नायू मजबूत करण्यासोबत वजन कमी करण्यास मदत होते. 

6/6

(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)