मुंबई : बॉलीवूड जगतात एंट्री करणाऱ्या प्रत्येक अभिनेत्रीला सलमानसोबत लीड रोल करायला मिळावा अशी इच्छा असतेच. सलमान सध्या बॉक्स ऑफिसचा राजा आहे. त्यामुळे त्याचे कोणतेही सिनेमे हे हिट होतातच.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्याच्यासोबत काम करायला बॉलीवूडच्या हिरोईन उत्सुक असतात. मात्र एक काळ असा होता की सलमान आणि भाग्यश्रीचा सुपरडुपर हिट ठरलेल्या मैने प्यार किया या सिनेमात सलमानसोबत रोमान्स करताना भाग्यश्री ढसाढसा रडली होती. 


अभिनेत्री भाग्यश्रीचा हा पहिलावहिला सिनेमा होता. यावेळी सिनेमातील रोमँटिक सीन दरम्यान भाग्यश्री इतकी रडली होती की तिला इतरांनी बराच वेळ समजावल्यानंतर ती शांत झाली होती. 


कबूतर जा जा... या गाण्यातील हा सीन होता. हे गाणं संपल्यानंतर भाग्यश्री सलमानच्या मिठीत विसावते असा तो सीन होता. यावेळी एका परपुरुषाच्या मिठीत विसावण्याच्या कल्पनेनेच भाग्यश्रीला रडू कोसळले होते. नेमके काय घडले कुणालाच काही कळेना. सलमाननेही आपले काही चुकले का असा प्रश्न भाग्यश्रीला केला. मात्र तिने नाही म्हणत मान डोलावली. 


अखेर या सिनेमाचे दिग्दर्शक सुरज बडजात्या यांनी भाग्यश्रीला आपल्यापरीने खूप समजावले आणि तुझ्या पद्धतीने सीन करु असे सांगितल्यावर ती तयार झाली आणि सीन शूट करण्यात आला.