मुंबई : बॉलिवूडमध्ये सगळ्यात जास्त फिमेल फॅन फॉलोईंग असणारा सुपरस्टार सलमान खान याने एक वक्तव्य केलं आहे. सलमानच्या या वक्तव्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फ्रीकी अलीच्या ट्रेलर लाँचिंगच्या दरम्यान सलमानने हे वक्तव्य केलं आहे. फ्रीकी अली सिनेमामध्ये अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी लीड रोलमध्ये आहे. या सिनेमामध्ये नवाजुद्दीन एक यौन संबंधांसाठी इच्छुक असलेल्या भूमिकेत आहे. ट्रेलर लाँचिंगदरम्यान सलमानने वक्तव्य केलं आहे की, लग्न आणि यौन संबंधाचा त्याच्या जीवनात अजून सामना झालेला आहे.


सलमानने म्हटलं की, त्याचं अजून लग्न झालेलं नाही आणि ते ही झालेलं नाही. या सिनेमामध्ये एमी जॅक्सन आणि अरबाज खान देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.