मुंबई : बलात्काराबाबत केलेल्या वक्तव्यामुळे सलमान खाननं नवा वाद ओढावून घेतला आहे. सलमान खान सध्या त्याचा आगामी चित्रपट सुलतानच्या प्रोमोशनमध्ये व्यस्त आहे. यावेळी विचारण्यात आलेल्या एका प्रश्नावर सलमाननं वादग्रस्त उत्तर दिलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुलतानमध्ये केलेली कुस्तीपटूची भूमिका किती आव्हानात्मक होती, असा प्रश्न सलमानला विचारण्यात आला. सहा तास शूटिंगच्यावेळी मला 120 किलोच्या माणसाला दहा वेळा दहा वेगवेगळ्या एँगलनं उचलावं लागायचं आणि जमिनीवर लोळवावं लागायचं. खऱ्या मॅचमध्ये एवढेवेळा असं करावं लागत नाही. त्यामुळे चित्रपटाचं शूटिंग संपल्यावर मला बलात्कार झालेल्या महिलेला जसं वाटेल तसं वाटायचं असं सलमान म्हणाला आहे. 


बलात्काराबाबतच्या या वक्तव्यामुळे सलमान खानवर टीका व्हायला लागली आहे. सोशल नेटवर्किंग साईट्सवर सलमानविरोधाचा सूर उमटू लागला आहे.