सलमानचे वक्तव्य असंवेदनशील आणि दुर्दैवी असल्याचे : आमिर खान
अभिनेता सलमान खानने बलात्कारासंदर्भात केलेले वक्तव्य असंवेदनशील आणि दुर्दैवी असल्याचे आमिर खानने म्हटले आहे.
मुंबई : अभिनेता सलमान खानने बलात्कारासंदर्भात केलेले वक्तव्य असंवेदनशील आणि दुर्दैवी असल्याचे आमिर खानने म्हटले आहे.सलमानला त्याची चूक कळली असेल, अशी आशा करुया असे आमिरने म्हटले आहे. मात्र त्यानंतर सावध पवित्रा घेत आमिरने सलमानवर बोलणं टाळले. आमिरच्या आगामी दंगल या सिनेमासंदर्भाल्या पत्रकार परिषदेत त्यानं सलमानच्या वक्तव्यावर टीका केली.
दरम्यान, सलमान खानच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर सलमानच्या वडिलांना त्याच्या पाठीमागे बचावासाठी उभे राहावे लागले. सलमानच्या वादग्रस्त वक्तव्यावर सलीम खान यांनी माफी मागितली. सलमान बोलला ते चुकीचे होते, मात्र त्याचा बोलण्यामागचा उद्देश चुकीचा नव्हता. जरी त्याच्या वडिलांनी माफी मागितली तरी सलमाने अजुनही माफी मागितलेली नाही.
सुल्तान सिनेमाची शुटिंग झाल्यानंतर मला बलात्कार पीडीत महिलेसारखं वाटत होतं, असं वादग्रस्त वक्तव्य सलमान खानने केलं आहे.
.