मुंबई : सलमानची खानची बहीण अर्पिता खानच्या डोहाळेजेवणाचा समारंभ रविवारी हॉटेल ताज लँडसमध्ये पार पडला. या समारंभासाठी बॉलीवूडचे अनेक कलाकार उपस्थित होते. मात्र या सर्वांत लक्ष वेधून घेतले ते सलमानची एक्स-गर्लफ्रेंड संगीता बिजलानीने. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

समारंभ संपल्यानंतर सलमान तिला सी-ऑफ करण्यासाठी बाहेरही निघाला. यावेळी दोघांमधील क्यूट केमिस्ट्री कॅमेऱ्यात कैद झाली. या सलमानच्या घरातील सर्व कुटुंबिय उपस्थित होते. मात्र अरबाज आणि मलायका अरोरा समारंभात कुठे दिसले नाहीत. 


याशिवाय शिल्पा शेट्टी, अनुष्का शर्मा, एली अवराम, स्नेहा उलाल, कबीर खान, रितेश देशमुख, जेनेलिया, वहिदा रेहमान, डब्बू रतनानी आदी उपस्थित होते.