संजय दत्त पुन्हा जेल बाहेर येणार
पुणे : जेलची हवा खाणारा बॉम्बस्फोटातील आरोपी अभिनेता संजय दत्त पुन्हा एकदा जेलच्या बाहेर येणार आहे. त्याला ३० दिवसांचा पॅरोल मंजूर झालाय.
१९९३मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बाँबस्फोटांच्यावेळी बेकायदेशिररित्या शस्त्रास्त्रे बाळगल्याप्रकरणी जेलची शिक्षा संजय दत्त भोगत आहे. तो येत्या १-२ दिवसांत संजय पॅरोलवर बाहेर येईल. संजयच्या मुलीच्या नाकावर शस्त्रक्रिया असून त्यावेळी कुटुंबियांसोबत उपस्थित राहता यावे यासाठी संजयने पॅरोलसाठी (संचित रजा) अर्ज केला होता. प्रशासनाकडून तो अर्ज मंजूर झालाय.
मुंबई बॉम्बस्फोटांमध्ये बेकायदेशिररित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी संजय दत्तला न्यायालयाने पाच वर्षांची जेलची शिक्षा सुनावली आहे. मात्र खटल्याचा निकाल लागण्यापूर्वीच संजय सुमारे दीड वर्ष तुरुंगात होता. त्यामुळे त्याला तीन वर्षांचीच शिक्षा भोगावी लागत आहे. त्याआधी पत्नी मान्यतावर उपचार करण्याच्यावेळी संजय दत्तला पॅरोल मिळाला होता.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
संजय दत्त पुन्हा जेल बाहेर येणार