`दे धक्का`च्या रिमेकमध्ये संजय दत्त वडिलांच्या भूमिकेत
दिग्दर्शक महेश मांजरेकर आणि बॉलीवूड अभिनेता संजय दत्तने यांनी यापूर्वी अनेकदा एकत्र काम केलीत. आता हे दोघे पुन्हा दे धक्का चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र येतायत.
मुंबई : दिग्दर्शक महेश मांजरेकर आणि बॉलीवूड अभिनेता संजय दत्तने यांनी यापूर्वी अनेकदा एकत्र काम केलीत. आता हे दोघे पुन्हा दे धक्का चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र येतायत.
दे धक्का या मराठी सिनेमाचा हिंदी रिमेक केला जाणार आहे. या रिमेकचे दिग्दर्शन महेश मांजरेकरच करणार असून यात संजय दत्त वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहे.
2008मध्ये दे धक्का सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद लाभला होता. दे धक्काच्या हिंदी रिमेकमध्ये संजय दत्त चाळिशीतील वयाच्या वडिलांची भूमिका साकारणार आहे. यात तो पंजाबी मॅन असेल.
दत्त आणि मांजरेकर यांनी वास्तव, कुरुक्षेत्र आणि रख्त या सिनेमात एकत्र काम केलंय. दरम्यान, दे धक्काच्या रिमेकमध्ये संजयच्या बायकोची भूमिका कोण करणार हे निश्चित झालेले नाहीये.