पुणे : १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटावेळी अवैध हत्यारं बाळगल्याप्रकरणी शिक्षा भोगत असलेला दोषी संजय दत्त याची २५ फेब्रुवारीला सुटका होणार आहे. याच निमित्तानं त्याच्या एका चाहत्यानं मोफत चिकन वाटण्याची घोषणा केलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संजय दत्तचा हा चाहता भेंडी बाजारातील एका रेस्टॉरंटचा मालक आहे. ज्या दिवशी संजय दत्त तुरुंगातून बाहेर पडेल त्यादिवशी त्याच्या चाहत्यांना मोफत चिकनची मेजवानी देण्यात येईल, अशी घोषणा नूर मोहम्मदी रेस्टॉरंटचा मालक खालिद हाकिमनं केलीय.


संजय दत्तनं आपल्याला चिकनची एक स्वादिष्ट रेसिपी सांगितली होती... त्यामुळेच त्यानं या डिशचं नाव 'चिकन संजूबाबा' असं केलंय. या डिशसाठी खवय्यांची चांगलीच मागणीही आहे.  


५ वर्षांची शिक्षा भोगून संजय दत्त येत्या शुक्रवारी म्हणजे २५ फेब्रुवारीला तुरुंगातून बाहेर येणार आहे.