मुंबई : अभिनेता संजय दत्तची मुलगी त्रिशला हिच्या बॉलिवूडमध्ये पदार्पणाच्या चर्चा सुरू असतानाच याच कुटुंबातली आणखी एक मुलगी सज्ज झालीय... बॉलिवूडमध्ये धडकण्यासाठी...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाझिया हुसैन असं ही संजय दत्तच्या मामेभावाची मुलगी... म्हणजेच संजय दत्तची पुतणी... बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी ती पूर्ण मेहनत घेतेय. 


'आशिकी - २' या सिनेमाच्या तमिळ रिमेकमध्ये नाझिया पहिल्यांदा दिसली.... त्यानंतर आता तिला 'टॉम डिक हॅरी' या २००६ मध्ये प्रदर्शित झालेल्या सिनेमाच्या सिक्वेलमध्ये काम करण्याची संधी मिळालीय. 


पण, संजय दत्तची पुतणी म्हणून तर स्वत:च्या मेहनतीवर नाझियाला उभं राहायचंय. सामान्य मुलींसारखी मी ऑडिशनच्या रांगेत उभी राहते... ट्रेनमधून प्रवास करते, असं नाझिया सांगते.