मुंबई : "बाहुबली २' प्रदर्शित झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर आपले वर्चस्व गाजवत आहे. बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानने 'बाहुबली २'च्या रेकॉर्डतोड कमाईवर प्रतिक्रिया दिलीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

किंग खानच्या मते 'बाहुबली २' हा असा सिनेमा आहे ज्यात सर्वकाही आहे. न्यूज एजंसी IANS ला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांने सांगितले की, बाहुबलीला मिळत असलेले यश पाहता हे सिद्ध होते की हिंमतीशिवाय प्रतिष्ठा मिळत नाही. 


दरम्यान, आपण अद्याप बाहुबलीचा दुसरा भाग पाहिला नसल्याचे त्याने सांगितले. मात्र हा प्रेरणा देणारा सिनेमा आहे, असे पुढे शाहरुख म्हणाला.