मीरा-शाहीदनं जाहीर केलं आपल्या चिमुरडीचं नाव...
शाहिद आणि मिरा कपूर यांना नुकतंच कन्यारत्न प्राप्त झालंय. मात्र, या बाळाचं नाव अद्याप या जोडप्यानं जाहीर केलं नव्हतं.
मुंबई : शाहिद आणि मिरा कपूर यांना नुकतंच कन्यारत्न प्राप्त झालंय. मात्र, या बाळाचं नाव अद्याप या जोडप्यानं जाहीर केलं नव्हतं.
शाहिद आणि मिरा आपल्या चिमुरडीचं नाव काय ठेवणार? याबद्दल शाहिदच्या फॅन्ससहीत अनेकांना उत्सुकता होती... हीच उत्सुकता शाहिदनं आत्तापर्यंत ताणून ठेवली होती.
नुकतीच या जोडप्यानं अमृतसरला भेट दिली. या भेटीत त्यांनी आपल्या चिमुरडीचं नाव जाहीर केलंय. 'मीशा' असं आपल्या लाडक्या मुलीचं नामकरण त्यांनी केलंय.
मिराचं 'मी' आणि शाहिदचं 'शा' असं 'मीशा' हे नाव जाहीर करताना, 'अर्धा मी आणि अर्धी तू... पण, केवळ अर्ध मिरा आणि अर्ध शाहिद असं हे नाव आहे म्हणून ते स्पेशल नाही... तर रशियन भाषेत 'मीशा'चा अर्थ आहे 'देवासारखं' असं कौतुकानं त्यांनी म्हटलंय.