मुंबई : चाकलेट बॉय आणि अभिनेता शाहिद कपूरची लहान बहिण सना कपूरचा साखरपुडा झाला आहे. एका वेबसाईटने असा दावा केला आहे की, सनाने अभिनेता मनोज पहवा आणि सीमा पहवा यांचा मुलगा मयंक पहवासोबत साखरपुडा केला केला आहे. ओम पुरी यांचं निधन झाल्याने दोघांचा साखरपुडा अतिशय शांत पद्धतीने करण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सना आणि मयंक यांच्या साखरपुड्याची माहिती ओम पुरी यांची पत्नी नंदिता यांच्यामुळे समोर आली आहे. नंदिता यांनी एका वेबसाईटला दिलेल्य़ा मुलाखतीत ओम पुरी यांच्या मृत्यू आधीच्या घटनांचा उल्लेख करत असतांना त्यांच्याकडून ही माहिती कळाली. त्यांनी हे देखील म्हटलं की, आम्ही पंकज कपूरची मुलगी सना आणि पहवा यांचा मुलगा मयंक यांच्या साखरपुड्याला देखील जाणार होतो तेव्हा ओम पुरी यांनी मला फोन केला.' त्यांच्या या मुलाखतीमध्ये सांगितलेल्या गोष्टीमुळे बॉलिवूडमध्ये ही गोष्ट पसरली. पण याबाबत दोघांच्या कुटुंबियांनी कोणतीही माहिती दिलेली नाही.


सना कपूर ही अभिनेते पंकज कपूर आणि सुप्रिया पाठक यांची मुलगी आहे. शाहिदच्या दुसऱ्या आईची ती मुलगी आहे. सनाने बॉलिवूड सिनेमा 'शानदार' मधून डेब्यू केलं होतं. या सिनेमात आलिया भट्टच्या बहिणीचा रोल तिने केला होता.