मुंबई: शाहरुख खानच्या फॅननं पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर 19.20 कोटी रुपये कमावले. पण दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी मात्र फॅनल म्हणावी तशी चमक दाखवता आली नाही. शनिवारी फॅननं पहिल्या दिवसापेक्षा 20 टक्के कमी म्हणजेच 16.50 कोटी रुपये कमवले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या दोन दिवसांची बेरीज केली तर आत्तापर्यंत फॅननं 35.70 कोटींचा गल्ला जमवला आहे. त्यामुळे शाहरुखच्या या चित्रपटानं सरासरी कमाई केल्याचं समिक्षकांचं म्हणणं आहे. 


याआधी शाहरुखच्या दिलवालेनंही म्हणावी तशी चमकदार कामगिरी केली नव्हती. त्यामुळे फॅनचं दुसऱ्या दिवशीचं पडलेलं कलेक्शन पाहून शाहरुखच्या चिंता कदाचित वाढल्या असतील. 


तसंच रविवारचा दिवस शाहरुखसाठी महत्त्वाचा मानला जातोय. सुट्टी असल्यामुळे हा चित्रपट पाहायला पसंती देतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पहिल्या तीन दिवसांमध्ये फॅन 55 कोटी कमवेल असा अंदाजही बांधला जात आहे. 


शाहरुखच्या फॅनसमोर जंगलबूक हा बिग बजेट सिनेमा आहे. त्यातच विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपल्यामुळे त्यांनी आणि पालकांनी या रविवारी जंगलबूक पाहायला पसंती दिली तर मात्र फॅनच्या कमाईवर मोठा परिणाम होऊ शकतो.