मुंबई : आपले फोटोज् सोशल मीडियावर शेअर करुन पब्लिसिटी वाढवण्याची सवय जवळजवळ सगळ्याच अभिनेत्यांना असते. स्वत:चे पेज तयार करून त्यावर फोटोज पोस्ट करायचे आणि आपला फॅन क्लब वाढवायचा फंडा या कलाकारांचा असतो.

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चार वर्षांपूर्वी बायपोलार डिसॉर्डर झालेल्या क्षमा सिकंदरनेही हाच फंडा वापरलाय. या आजारातून बाहेर पडणे ही तिच्याकरिता खूप मोठी गोष्ट होती. ती इतकी दिशाहिन झालेली की तिच्या आयुष्यात काय घडतय हे देखील तिला कळत नव्हते. ती इतकी उदास, निराश व्हायची की, कधीकधी मध्यरात्री उठून तिला रडू यायचे. आजारपणामुळे ही अभिनेत्री जवळपास ४ वर्षे लाइमलाइटमध्ये नव्हती. 


क्षमाचा इंडस्ट्रित कमबॅक


त्यामुळेच इतर अभिनेत्यांप्रमाणेच क्षमानेदेखील पुन्हा लाईमलाईटमध्ये येण्याकरिता सोशल मीडियाचाच आधार घ्यायचे ठरविले. आजारपणातून बाहेर आलेल्या क्षमाने आता तिचे फोटो इंन्स्टाग्रामवर शेअर केलेत. ब्लॅक गाऊन आणि टक्सिडोमधील हे हॉट फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होतायत...



हे पाहा क्षमाचे काही फोटोज