`...तर मीही प्रत्युषासारखी आत्महत्या केली असती`
`भाभी जी घर पर हैं` या कार्यक्रमात एकेकाळी भाभीजीची भूमिका गाजवणारी अभिनेत्री शिल्पा शिंदे हिनं एक धक्कादायक विधान केलंय.
मुंबई : 'भाभी जी घर पर हैं' या कार्यक्रमात एकेकाळी भाभीजीची भूमिका गाजवणारी अभिनेत्री शिल्पा शिंदे हिनं एक धक्कादायक विधान केलंय.
या कार्यक्रमाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर या प्रोड्युसरवर शिल्पानं विनयभंगाचा आरोप केला होता. यासंबंधी तिनं पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रारही नोंदवली होती... 'मी हे सगळं पैशांसाठी करतेय असं लोकांना वाटत असेल... पण, मी ज्या परिस्थितीतून जातेय ती सहज सोपी नाही... मी प्रत्युषाप्रमाणेच आत्महत्याही केली असती...' असं या प्रकरणानं संतापलेल्या शिल्पानं म्हटलंय.
शिल्पानं केलेल्या आरोपांनंतर 'चंद्रमुखी चौटाला' म्हणजेच कविता कौशिकनंही शिल्पाच्या आरोपांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यालाच प्रत्युत्तर देताना शिल्पानं हे धक्कादायक विधान केलंय. सोबतच, 'माझ्यासोबत जे काही झालं त्या गोष्टींवर चर्चा करणं इतकं सोप्पं नाही. पण मी त्याचा सामना करत ते समोर आणलं' असंही शिल्पानं म्हटलंय.
प्रोड्युसर संजयनं आपल्याला अनेकदा चुकीच्या पद्धतीनं स्पर्श करण्याचा प्रयत्न केला तसंच ते आपल्याशी अश्लील वर्तवणूकही करत असल्याचा आरोप शिल्पानं केलाय.