भाजप-शिवसेना युतीवर चपखल बसतोय सैराटचा डायलॉग?
सैराट सिनेमाने राजकीय कार्यकर्त्यांनाही याड लावलं आहे, राज्यात शिवसेना-भाजप युतीत काहीसं बिनसल्याचं चित्र निर्माण झालं आहे.
मुंबई : सैराट सिनेमाने राजकीय कार्यकर्त्यांनाही याड लावलं आहे, राज्यात शिवसेना-भाजप युतीत काहीसं बिनसल्याचं चित्र निर्माण झालं आहे, यावरून कार्यकर्त्यांनी हे राजकीय चित्र सैराटच्या माध्यमातून रंगवण्यास सुरूवात केली आहे.
व्हॉटसअॅपवर शिवसेनेला आर्ची आणि परश्याला भाजप म्हणून, सैराटमधील खो-खो डाय़लॉग लिहिलाय, राजकीय भाषेत लिहिलेला हा डायलॉग, व्हॉटस अॅपवर व्हायरल होतोय आणि सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चपखल बसतोय का ते तुम्हीच पाहा?
वाचा, सैराट आणि युती
शिवसेना : काय बघतो रं
भाजप : कुठे काय? शासन बघतोय
शिवसेना : शासन? मगास पासून डॉळॅ वासुन बघतोय की माझ्याकडं
भाजपा : तुला कसं कळलं तुझ्याकडे बघतोय ते..
शिवसेना : मी माझ्या डोळ्यांनी पायलं..
भाजपा : तूच कशाला बगती मग, तूच नको बगू की...
शिवसेना : मी बगिन नाय तर काय पन करीन...
भाजप : मग मी पन बगिन नाय त काय पैन करीन.. तुला नसल आवडत तर तू नको बगू की.
शिवसेना : मी कुटे म्हटलं माल्नाय आवडत.. (मुझिक ढॅ ढॅ ढॅ....)
भाजपा : :)
(मागून राष्ट्रवादी : अरे भाजपा लेका, तुला कळलं का लगा ती काय बोल्ली, अरे ती जे बोल्ली ते म्हणजे तिला युती पायजे लेका.)