शिवसेनेचा पाकिस्तानी `माहिरा`ला विरोध, मल्टिप्लेक्सना इशारा
किंग खान शाहरुखच्या आगामी रईस या सिनेमाविरोधात कल्याण शिवसेना आक्रमक झाली आहे. सिनेमाला तीव्र विरोध केला आहे.
कल्याण : किंग खान शाहरुखच्या आगामी रईस या सिनेमाविरोधात कल्याण शिवसेना आक्रमक झाली आहे. सिनेमाला तीव्र विरोध केला आहे.
कल्याण पूर्वमधील शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड यांनी पोलीस आणि मल्टिप्लेक्सना निवेदन दिलंय. हा सिनेमा रिलीज झाला तर शिवसेना स्टाईल आंदोलन करु असा इशारा गायकवाड यांनी दिला आहे.
या सिनेमातील पाकिस्तानी कलाकार माहिरा खान हिच्या सहभागावर शिवसेनेचा आक्षेप आहे. तिचे सीन्स काढून सिनेमा प्रदर्शित करण्यास काहीही हरकत नसल्याचंही सांगण्यात आले आहे.