मुंबई : मागील काही महिन्यांतच फिल्म इंडस्ट्रीत विविध ट्रेंड्स पहायला मिळालेत. भारतीय चित्रपट सृष्टीत बॉलिवूडने कायमच आपले वर्चस्व दाखवले आहे. गेल्या काही आठवड्यांपासून मात्र आता हॉलिवूड बॉलीवूडवर वर्चस्व दाखवायला लागेल की काय असं धक्कादायक चित्र दिसू लागले आहे.

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जंगल बूक, कॅप्टन अमेरिका, सीवील वॉर, X-मेन ह्या सिनेमांनी फॅन, एअरलिफ्ट, सरबजीत यांसारख्या बॉलिबूडच्या सिनेमांना बॉक्स ऑफिसवर चांगलीच टक्कर दिली आहे.

द जंगल बूक या चित्रपटाने १८३ कोटी कमविले तर दुसरीकडे  फॅन या किंग खानसारख्या बॉलिवूडच्या सुपरहिट अभिनेताच्या चित्रपटाने फक्त ८४ कोटींची कमाई केली. यामुळे बॉलिवूडला हॉलिवूडच्या चित्रपटांपासून धोका जाणवू लागला आहे.

बॉलिवूडकडे चांगल्या संधी असतात फक्त कॉलिटीकडे लक्ष दिले पाहीजे असे बॉलिवूडचे चित्रपट वितरक आणि निदर्शक अक्षय राठी यांनी सांगितले. हीच वेळ आहे बॉलिवूडच्या दिग्दर्शकांकरिता आपली कॉलिटी सिद्ध करण्याची. जर एअरलिफ्ट, बजरंगी भाईजान, पी.के. यांसारख्या फिल्म्स बनवल्या तर लोकांचा कल हॉलिवूड जाणारच नाही.

हॉलिवूड कंटेन्टवर जास्त भर देते. बॉलिवूडच्या फिल्म्सने देखील केवळ स्टारकास्टवर भर न देता स्टोरी टेलिंग, कंटेन्ट, यावर जास्त लक्ष केंद्रित करावे असाही सल्ला अक्षय राठी यांनी दिला.