मुंबई : प्रसिद्ध पार्श्वगायिका श्रेया घोषाल आता मराठी सीरियल विश्वात एंट्री घेतेय. तुम्ही म्हणाल ती अभिनय वगैरे करणार आहे की काय? तर तसे मुळीच नाहीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झी मराठी वाहिनीवरील खुलता कळी खुलेना या मालिकेच्या शीर्षकगीताला श्रेया घोषालचा आवाज लाभणार आहे. समीर सप्तीसकरने या गीताला संगीत दिलेय.


याआधी महालक्ष्मी अय्यर, साधना सरगम या बॉलीवूड गायिकांनी मराठी सीरियलसाठी शीर्षकगीत गायले आहे. श्रेयाने यापूर्वी अनेक मराठी गाणी गायलीयेत. जोगवा, सैराट, लय भारी, हॅपी जर्नी, डबल सीट, सैराट या चित्रपटांमध्ये तिने गाणी गायलीयेत. 


येत्या १८ जुलैपासून ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. सुप्रसिद्ध दिग्दर्शक हेमंत देवधर हे या मालिकेचे दिग्दर्शन करत आहेत. ओमप्रकाश शिंदे प्रमुख भूमिकेत असून त्याच्यासह अभिज्ञा नाईक आणि मयुरी देशपांडे हे नवे चेहरेही दिसणार आहेत.