परशा आणि नागराजच्या आयुष्यातील घटनांमध्ये हे आहे साम्य...
`सैराट`मधला परशा आणि या भूमिकेची निर्मिती करणारा नागराज... या दोघांमध्ये काही साम्य आहे का? `सैराट`मधली दृश्यं आणि नागराज यांच्या वैयक्तिक आयुष्यात काही साम्य आहे का? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल...
मुंबई : 'सैराट'मधला परशा आणि या भूमिकेची निर्मिती करणारा नागराज... या दोघांमध्ये काही साम्य आहे का? 'सैराट'मधली दृश्यं आणि नागराज यांच्या वैयक्तिक आयुष्यात काही साम्य आहे का? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल...
हे आहे साम्य...
तुम्हाला माहीत आहे का, की आर्चीवर जिवापाड प्रेम करणाऱ्या परशाच्या आणि नागराजच्या आयुष्यातील एका प्रसंगात मात्र नक्कीच साम्य आहे.
'सैराट'मध्ये एक प्रसंग आहे... जिथं आर्चीवर प्रेम करणारा परशा तिच्या चप्पलांवर फुलं ठेवतो... मंदिरातून बाहेर पडलेली आर्ची हे फुलं बघते... आणि तिला ताबडतोब ही फुलं परशानंच ठेवलीत याचा अंदाजाही येतो... ती आपल्या हातांनी ही फुलं उचलते... आणि अलवार वर उचलत त्यांचा सुगंध आपल्यात भरून घेते. असाच एक प्रसंग नागराजच्याही आयुष्यात घडलाय... पण, त्याचा रिझल्ट मात्र वेगळाच होता.
मग काय घडलं...
नागराजनंही आपल्या उमलत्या वयात आपल्या एका प्रेयसीच्या चप्पलांवरदेखील अशीच फुलं ठेवली होती... पण, तिला मात्र ही फुलं कुणी ठेवलीत याचा अंदाजा आला नाही... तिनं ती फुलं लाथाडली आणि तिथून निघून गेली.
ही आठवण शेअर केलीय या सिनेमाचा संगीतकार अतुलनं... एका मुलाखतीत बोलताना नागराजनंच सांगितलेली ही आठवणं अतुलनं बोलून दाखवली.