भजन गायलेली मुस्लिम तरुणी कट्टरपंथींच्या निशाण्यावर
कन्नडच्या एका रिअलिटी शोमध्ये हिंदू धार्मिक गाणं गायल्यामुळे एका मुस्लिम तरुणीवर कट्टरपंथी लोकांचा ऑनलाईन हल्ला सहन करावा लागत आहे.
बंगळुरू : कन्नडच्या एका रिअलिटी शोमध्ये हिंदू धार्मिक गाणं गायल्यामुळे एका मुस्लिम तरुणीवर कट्टरपंथी लोकांचा ऑनलाईन हल्ला सहन करावा लागत आहे.
मंगलोर मुस्लिम नामक समूहाने फेसबुकवर एका पोस्टमध्ये सुहाना सय्यदवर समुदायाची इमेज खराब करण्याचा आरोप केला आहे. या पोस्टमध्ये म्हटले आहे की दुसर्या धर्माच्या लोकांसोमर गाणं गाऊन आणि निर्णायकांची स्तुती मिळवून तुम्ही काही महान काम केले आहे हा विचार चुकीचा आहे.
मुलीला या कार्यक्रमात भाग घेण्याची परवानगी देण्यासाठी तिचा आई-वडिलांची आलोचना करत टिप्पणी केली गेली की तुम्ही नरकाचा रस्ता निवडला आहे पण दुसर्यांना बरबाद करण्यासाठी प्रोत्साहित का करत आहात.
शिवमोगा जिल्ह्यातील सगाराची सुहाना ही झी कन्नडच्या प्रसिद्ध रिअलिटी शो 'सा रे ग म प' याची सहभागी आहे. तिने बालाजीचे स्तुतिगान ‘श्रीकरणे, श्रीनिवासने’ गायले होते.
पाहा संपूर्ण गाणे...